LIVE UPDATES

दशावतार कलावंतांच्या सदैव सोबत राहणार

आमदार निलेश राणेंनी दिला विश्वास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 11:15 AM
views 209  views

मालवण : कोकणची पारंपारिक दशावतार लोककला जपणायचे आणि समृद्ध ठेवण्याचे कार्य माझा दशावतार कलावंत करत असताना अनेक वर्ष न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत होता. हा संघर्ष मी प्रत्यक्ष बघितला आहे. शासन दरबारी दशावतार कलावंतांना न्याय मिळवून देत असताना सदैव सोबत राहणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

मी विधिमंडळात दशवतार कलाकार यांचा आवाज बनलो. मात्र यासाठी सातत्याने दत्ता सामंत यांचा पाठपुरावा महत्वाचा राहिला. महायुती सरकारच्या माध्यमातून  सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी या कलावंतांना शासन दरबारी न्याय देण्याची घोषणा केली. लवकरच याबाबत शासन निर्णय होईल. दशावतार कलावंत हे कुटुंब असून मी सोबतच राहणार. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.आमदार निलेश राणे यांची झालेली ही भेट ही कृतज्ञता सोहळा ठरली. विधानसभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज ठामपणे उठवत आम्हाला आमदार निलेश राणे यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिला. असे सांगत पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश जी राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नेहमी दशावतार कलाकारांच्या हाकेला साथ देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही यात मोलाचा वाटा आहे. असे सांगत त्यांचाही सन्मान करण्यात आला. 

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच कोकणात दशावतार कलावंत यांचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून ऋण व्यक्त केले जाणार आहेत. असेही दशावतार कलावंत यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी व दशावतार कलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.