LIVE UPDATES

नरडवेत नवीन स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जळाली

९३ हजार ५०० रुपयांचे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 10:54 AM
views 70  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नरडवे तांबटवाडी येथे उभी असलेली नवीन स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे ९३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून कणकवली पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.याबाबत नरडवे तांबटवाडी येथील अमृत रामचंद्र घाडीगावकर (वय ३९) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस (एमएच-०७ एव्ही-७२३४) ही नवीन काळ्या रंगाची मोटारसायकल १३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अचानक कशाने तरी आग लागून पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेची नोंद १४ जुलै रोजी दुपारी १२.२२ वाजता कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. वेंगुर्लेकर करीत असून, मोटारसायकलीला आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत.