
देवगड : " दीक्षित फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जात आहेत. या सर्व कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला सहभाग या उपक्रमांमध्ये अधिकाधिक द्यावा "असे आवाहन दिक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी केले.
दीक्षित फाउंडेशन मार्फत शैक्षणिक वर्ष २५-२६ मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा आणि फाउंडेशन मार्फत यावर्षी देवगड हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी करिता घेण्यात आलेल्या संगणक प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार कार्यक्रम देवगड हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष . सदानंद पवार शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रविण खडपकर संगणक विषय शिक्षिका चारुलता तारकर आदी उपस्थित होते.
यावेळी निरंजन दीक्षित यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व पारितोषिक विजेत्यांना दीक्षित फाउंडेशन मार्फत आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
यावेळी उपस्थित पालकांमधून डॉ. रीमा प्रभू देसाई, ॲड. अन्वी कुळकर्णी, सुदेश गोलतकर यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमध्ये दीक्षित फाउंडेशनचे कौतुक केले आणि भविष्यात देखील दीक्षित फाउंडेशन ने अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे त्यासाठी पालकांचे पूर्ण सहकार्य असेल असे आश्वासित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण खडपकर तर आभार आणि निवेदन चारुलता तारकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








