LIVE UPDATES

Sawantwadi Deepotsav : लक्ष दिव्यांनी उजळलं सावंतवाडीच 'हृदय'

अभिनव फाउंडेशनचा दीपोत्सव उत्साहात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 06:55 PM
views 46  views
Thousands of diyas illuminate the historic Moti Lake during Diwali Deepotsav organized by Abhinav Foundation in Sawantwadi.

सावंतवाडी : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या दीपोत्सवाचा प्रारंभ युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी स्वयंस्फूर्तीने तलावाच्या काठावर दीपप्रज्वलन केले. यामुळे मोती तलाव काठ लाखो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता. यानिमित्ताने खास उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर अनेक नागरिकांनी सेल्फी घेऊन ही आठवण आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवली.

यावेळी दत्तप्रसाद गोठोसकर, सभापती मोहिनी मडगांवकर, संतोष वैज, सीए.  चिन्मय रानडे, किशोर चिटणीस, अण्णा म्हापसेकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, राजू केळूसकर, जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे,अमित आरवारी, जतीन भिसे, मंदार केरकर, बाळू वालावलकर, प्रथमेश मुरगूड, अमित सुकी, मयूर मिशाळ, मंदार पावसकर, रवींद्र आरोलकर, मुकुंद वझे, विनायक रांगणेकर,श्रीराम नेवगी,अनुष्का केळूसकर, प्राची रानडे, हेमश्री चिटणीस, अक्षया म्हापसेकर,नम्रता नेवगी,रुपाली नार्वेकर, पूजा आरवारी, संजीवनी विचारे,पूर्वा केरकर, विशाखा रांगणेकर आदी उपस्थित होते. दीपोत्सवानंतर अभिनवच्या सदस्यांनी मेणबत्ती कप उचलून तलावाच्या काठावर मेण वितळून काठ खराब होणार नाही याचीही दक्षता घेतली.