
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमध्ये शितयुद्ध सुरू असून नगराध्यक्षांवरच विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. यांच्या वादात सावंतवाडीचा सत्यानाश होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आपले वाद मिटवावे, जनतेला वेठीस धरू नये असे मत माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केले. तसेच ऑडिटर अनुपस्थित होता तर ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या उपनगराध्यक्षांनी त्याचवेळी आक्षेप का घेतला नाही असा सवालही श्री. परब यांनी केला.
माजी नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले, सावंतवाडी न.प. मध्ये सध्या सुरू असणार धुमाकूळ बघवत नाही. प्रशासन कसं चालवायचं हे ज्ञात नसल्याने हे प्रसंग ओढावत आहेत. वेंगुर्लेत दिलीप गिरीप काम जसं काम करत आहेत तसंच काम अपेक्षित आहे. मात्र, इथे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये शितयुद्ध सुरू आहे. विशेष सभेत 'थर्ड पार्टी ऑडिट' हे समाधानकारक असल्याचा रिपोर्ट दिला होता.
तेव्हा उपनगराध्यक्ष ऑनलाईन उपस्थित होते. जर ऑडीटर नव्हता तर तो विरोध त्याचवेळी उपनगराध्यक्षांनी दर्शविला पाहिजे होता. नगराध्यक्षांनी ऑडिटर नसताना सभा घेतली याचा अर्थ त्यांना त्यांची आवश्यकता वाटली नाही. ऑडीटवर नगराध्यक्षांचा विश्वास असेल. मात्र, नगराध्यक्षांवर उपनगराध्यक्षांचा विश्वास नाही का ? असा सवाल श्री. परब यांनी केला. तसेच नगराध्यक्ष कमी पडत असून उपनगराध्यक्षांच्या प्रेसमुळे ते दिसून येत आहे. नगराध्यक्षांवर यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होतेय असाही टोला त्यांनी हाणला.
दरम्यान, सभेत नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला किंमत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच उपनगराध्यक्ष बाहेर येऊन विरोध करतात. यात जर काम बंद पडून योजना पूर्ण होऊन जनतेला पाणी न मिळाल्यास त्याचा जाब आम्ही नगराध्यक्षांना विचारणार आहोत. कारण, काम बंद पडलं तर खर्चाची किंमत दुप्पट होणार व भविष्यात शहराला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आपले वाद मिटवावेत, जनतेला वेठीस धरू नये. विशेष सभेत झालेला ठराव बदलता येतो का ? असाही सवाल त्यांनी केला.
तसेच २८ कोटीच काम झालं की नाही ? हे सीओंना विचारलं पाहिजे. अन्यथा, त्याची चौकशी लावावी, कोणी पैसे खाल्ले त्याची माहिती घ्यावी. नगरपरिषदेत सत्ताधारी ते आहेत आम्ही नाही. त्यामुळे काम पूर्ण न होता का बील दिलं ? हे तपासून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन करत ही जबाबदारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधारी यांची असल्याचा टोला त्यांनी लगावला.
तसेच जर नगराध्यक्षांना ऑडिटर येणार नाही हे ठावूक होत तर बैठक तहकूब करायला हवी होती. मात्र, तसं झालं नाही. सभेत चुकीचं काम पुर्ण करून जानेवारी पर्यंत उर्वरीत योजनेचं काम पुर्ण करण्याच मान्य झालं. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आपलं शितयुद्ध मिटवावा. अन्यथा, यांच्या भांडणात सावंतवाडीचा सत्यानाश होणार असल्याचे विधान संजू परब यांनी केले.
दरम्यान, सावंतवाडीच मानबिंदू असणाऱ्या मोती तलावात ड्रेनेजच पाणी सोड जात आहे. यावर मी आवाज उठवल्यानंतर न.प. कडून दंडात्मक कारवाई संबंधितांवर करण्यात आली. मात्र, केवळ कारवाई करून सांडपाणी सोडण बंद होणार का ? असा सवाल त्यांनी केला.
तसेच मोती तलाव वाचवण्यासाठी आपण संघटना निर्माण करणार आहे. यातून तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असून सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. हा तलाव वाचवण्यासाठी आम. दीपक केसरकर, निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार असल्याचे संजू परब यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








