
दोडामार्ग : घोटगेवाडी येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत आज घोटगेवाडी खालची अंगणवाडी येथे जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात घोटगेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीनिवास शेटकर ,उपसरपंच सागर कर्पे, ग्रा.प.सदस्य नुतन पांगम यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक गोळी देऊन करण्यात आली. यावेळी मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
यावेळी अंगणवाडी सेविका संयोगिता वाडकर, मदतनीस सातार्डेकर आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सरपंच शेटकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पोटातील जंतांमुळे मुलांमध्ये अशक्तपणा, कुपोषण आणि अभ्यासात मागे पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे 1 ते 19 वर्षाच्या सर्व मुलांनी ही गोळी घेणे आवश्यक आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे.
अंगणवाडी सेविका वाडकर यांनी जंत होण्याची कारणे आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. मुलांनी नियमित हात धुणे, चप्पल घालणे आणि शौचालयाचा वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मुलांनी गोळ्या घेतल्यानंतर पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








