
देवगड : देवगड एसटी बसस्थानक परिसरात संशयास्पद बॅग आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून मॉक ड्रिल घेण्यात आले. संशयास्पद वस्तू आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी, तसेच अशा परिस्थितीत पोलिसांनी कशा प्रकारे तत्परतेने प्रतिसाद द्यावा, याचा सराव या प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास संबंधित यंत्रणांनी कशा प्रकारे कार्यवाही करावी, याबाबतची तयारी तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यात आले. अशा प्रसंगी नागरिकांनी संशयास्पद वस्तूला स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेशही या उपक्रमातून अधोरेखित झाला.
या मॉक ड्रिलमध्ये सिंधुदुर्ग येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) सहभाग घेतला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, पोलीस हवालदार अनंत भोगटे, गिरीश तळेकर व सुकर्ण पाटील, तसेच पोलीस शिपाई अमित राणे आणि पवन मोईन यांचा समावेश होता.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








