LIVE UPDATES

महिन्याभरात शहरातील मुख्य रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? नागरिकांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 12:20 PM
views 98  views

सावंतवाडी : शहरातील आरोग्य भुवन समोरील खड्डे नुकतेच बुजविण्यात आले होते. मात्र, महिनाभर देखील त्यातील डांबर टिकले नाही. रस्त्याच्या मध्यभागी भलेमोठे पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणाहून मोठी वर्दळ असते. पावसाच्या पार्श्वभूमीवर हे पडलेले खड्डे बुजविण्यात आले. मात्र, ठेकेदाराकडून केलेलं काम महिनाभर देखील टिकलं नाही. पुन्हा मोठे खड्डे त्या भागात पडले असून अपघात होत आहेत‌. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी केला आहे. गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ हे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.