
देवगड : जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि देवगड तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यामंदिर, किंजवडे येथे देवगड तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सान्वी समीर शिरवडकर हिने १४ वर्षे मुलींच्या वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.तिची दि. १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सान्वीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.“कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यश नक्कीच मिळते,” हे सान्वीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. तिच्या यशामुळे महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.










