LIVE UPDATES

एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचा आदर्श

साळशी सरमळेवाडी , देवणेवाडी ग्रामस्थांनी केले श्रमदान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 10, 2026 11:05 AM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साळशी सरमळेवाडी व देवणेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गणेश विसर्जनस्थळ तसेच तेथे जाणाऱ्या पायवाटेची श्रमदानातून साफसफाई केली. या उपक्रमातून दोन्ही वाड्यांतील एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

 या दोन्ही वाड्यांपासून गणेश विसर्जनस्थळ सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. येथे असलेल्या सार्वजनिक तळ्यात दरवर्षी दोन्ही वाड्यांतील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जन सोहळ्यास महिला, लहान मुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होत असल्याने विसर्जनस्थळाकडे जाणारी पायवाट स्वच्छ असणे आवश्यक होते.

  ही गरज लक्षात घेऊन दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील झाडी-झुडपे तोडली. मशीनच्या सहाय्याने वाढलेले गवत कापण्यात आले. तसेच गवतावर तणनाशकाची फवारणी करून सार्वजनिक तळ्याच्या परिसराचीही स्वच्छता करण्यात आली.

सार्वजनिक हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या या श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला. अशा सामूहिक उपक्रमांतून दोन्ही वाड्यांतील एकोपा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक ऐक्याची भावना अधोरेखित झाली.  या उपक्रमात सत्यवान सावंत,पांडुरंग सावंत , प्रसाद देवणे, महेंद्र देवणे, सुनील लाड, दीपक बागवे, योगेश परब, उमेश रावले, हर्षद सावंत ,भूषण सावंत, राजेंद्र साटम आदी ग्रामस्थांनी श्रमदान करून सहभाग घेतला.