LIVE UPDATES

देवगड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी प्रकाश राणे बिनविरोध

उद्योजक नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे यांच्यासह मान्यवरांकडून नूतन अध्यक्षांचे अभिनंदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 17:25 PM
views 101  views

देवगड : देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी प्रकाश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी प्रकाश राणे यांच्या नावाला सूचक म्हणून अभय बापट, तर अनुमोदक म्हणून समीर पेडणेकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील मरबळ यांनी काम पाहिले.

प्रकाश राणे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन प्रकाश बोडस, पंचायत समिती सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, सुनील पारकर, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, देवगड-जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, भाजप शहराध्यक्ष वैभव करगुटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, ज्ञानेश्वर खवळे, भूषण बोडस, नरेश डामरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, बापू जुवाटकर, अॅड. अभिषेक गोगटे, व्ही. सी. खडपकर , विजय वाळके,आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर उद्योजक नंदकुमार घाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांचे अभिनंदन व स्वागत केले. यावेळी बँकेचे संचालक अमोल तेली, समीर पेडणेकर, वैशाली तोडणकर, सुरेंद्र चव्हाण, संजय बांदेकर, बाबा आचरेकर, दिनेश घाटे, ललिता शेडगे व राजन चिके आदी उपस्थित होते. प्रकाश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड अर्बन बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळून बँकेच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.