LIVE UPDATES

सम्राट क्लबचा 'संगीत संध्या' कार्यक्रम दिमाखात

रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 16:19 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्यावतीने आयोजित करण्यात आलेला पहिलाच 'संगीत संध्या' कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या संगीतमयी मैफिलीत गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांमुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. 

 या कार्यक्रमात हर्ष नकाशे, कु. विधिता केंकरे, ॲड. सिद्धी परब आणि सौ. स्मिता केंकरे यांनी आपल्या मधुर आणि बहारदार गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनकडे अशा गुणी आणि अष्टपैलू कलाकारांची फळी असणे ही क्लबसाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे. या संपूर्ण संगीत संध्येला सौ. प्रतिभा चव्हाण आणि गुरुप्रसाद चिटणीस यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनाने विशेष रंगत आणली. 

१२१ वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक सालईवाडा सावंतवाडीत 21 दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार सुनील राऊळ, मालवणी कवी दादा मडकईकर,संचालक कौस्तुभ पेडणेकर डॉ सोनल लेले,डॉ ज्ञानेश्वर ऐवळे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगरसेविका सुकन्या टोपले आणि पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सालईवाडा मंडळाचे अध्यक्ष राजू भाट, ज्येष्ठ पदाधिकारी बाळ नार्वेकर विनोद सावंत तसेच अमरनाथ सावंत भोसले साबाजी नार्वेकर, कल्पना बांदेकर यशवंत सावंत,मयुरी टोपले,नेहा भांगले, डॉ सिद्धी ऐवळे, शीतल ऐवळे, वैभव केंकरे,सुचिता नकाशे,सानिका सासोलकर, सीताराम तेली,संजय नकाशे यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सावंतवाडी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर म्हणाले, संगीत ही मनांना जोडणारी एक सुंदर भाषा आहे. या पहिल्याच कार्यक्रमातून सम्राट क्लबने संगीत, कला आणि सांस्कृतिक परंपरेप्रती असलेली आपली कटिबद्धता अत्यंत सुंदरपणे सिद्ध केली आहे. पहिल्याच उपक्रमाला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद कौतुकास्पद असून, हीच एकजूट, मेहनत, कलाप्रेम आणि सांस्कृतिक बांधिलकी भविष्यात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनला नवनवीन उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास व्यक्त केला.