LIVE UPDATES

संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 16:36 PM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : आरोंदा-तळवणे मुख्य रस्त्यावरील आरोंदा जोशीवाडी येथे रस्त्याच्या बाजूचा काही भाग कोसळल्याने रस्त्याने  प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या ठिकाणी संबंधित विभागाने खबरदारी म्हणून बॅरल लावून ठेवले आहेत. यातील काही बॅरल शेत जमिनीतही पडले आहेत. मात्र, या घटनेला बरेच दिवस उलटूनही संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

या धोकादायक ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक तसेच ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीबाबत आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

धोकादायक ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.