LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 16:48 PM
views 186  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६  रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी कणकवली येथे ओम गणेश बंगल्यावर जनतेच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहेत.