LIVE UPDATES

IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड

श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे येथे पुष्पगुच्छ देऊन सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 06:09 PM
views 42  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे येथील शिक्षक सतीशकुमार कर्ले यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कामाचा गौरव करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा शिक्षकांचे अनुभव राज्यातील इतर शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचावेत, तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या पुरस्कारासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा व तालुकास्तरावर गठित समित्यांमार्फत पात्र शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये  कर्ले  यांची आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७ साठी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल पंचायत समिती देवगडचे गटशिक्षणाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते सतीशकुमार कर्ले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या निवडीबद्दल सतिशकुमार कर्ले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.