
सावंतवाडी : वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विद्यार्थी एकत्र यावेत व त्यांच्या विचारांचे मंथन होऊन विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचेद्वारा शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा' आयोजित करण्यात आला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलची जान्हवी विश्वास पाटील (इ.१० वी) हिने भारतीय ऊर्जाक्षेत्रे 2047 - संधी आणि आव्हाने याविषयावर वक्तृत्व सादर केले. या स्पर्धेमध्ये कु. जान्हवी विश्वास पाटील (इ.१० वी) हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.
तिची निवड विभागस्तरासाठी झाली आहे. या यशस्वितेसाठी व आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कु. जान्हवी तसेच पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, उपप्राचार्य एस.आय. कांबळे, पर्यवेक्षक एन.जी.मुठे तसेच पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षक संघ यांनी अभिनंदन केले व विभागस्तरासाठी शुभेच्छा दिल्या.











