
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नामनिर्देशनाने कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या 'रुग्ण कल्याण समिती'च्या सदस्यपदी भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि माजी नगरसेवक राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या कारभारावर योग्य नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










