LIVE UPDATES

रोहन रावराणेंना राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 29, 2026 12:40 PM
views 35  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रोहन जयेंद्र रावराणे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ), कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात रोहन रावराणे यांनी सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. याच उपक्रमांतर्गत श्री.रावराणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

रोहन रावराणे हे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे दोन वेळा नगरसेवक म्हणून नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्यांनी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.

कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, दत्तात्रय सूर्यवंशी, भारत माळी, एन. बी. मगदूम, शशिकांत मेहतर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, साहित्यिक सिताराम कुऱ्हाडे, उद्योजक डॉ. एम. बी. शेख, राजदीप सुर्वे, रंगराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.