
मंत्री नितेश राणेंची सभागृहात माहिती
मुंबई : पश्चिम मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या केंद्र शासनामार्फत पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत राज्याच्या जलक्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर पावसाळी मासेमारी बंदी लागू आहे. ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.
मात्र, मत्स्यसाठ्यांचे जतन व संवर्धन, माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकून राहावी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे मच्छीमारांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी ही बंदी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभा सभागृहात दिली.














