
कणकवली : कणकवली फोंडाघाटमध्ये रविवारी रात्री 8:30च्या सुमारास दरड कोसळल्यामुळे सिंधुदुर्ग ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते सिंधुदुर्ग दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घाट रस्त्यात दरड कोसळली.
मातीचा ढिगारा आणि दगड झाडे रस्त्यावर आली होती. त्यामुळे काही तासासाठी ठप्प झाली होती फोंडाघाट रस्त्याच्या नूतनीकरण काम सुरू असून निखिल कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावर आलेली दरड दोन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम केले. साधारणता दोन ते अडीच तास वाहतूक टप्पे होती पण रविवारी रात्रीच 11 नंतर ही वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.











