LIVE UPDATES

महसूल मंत्र्यांचा दौरा सिंधुदुर्गसाठी महत्त्वाचा

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 16:10 PM
views 56  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कणकवली दाखल झाले आहेत. सहाजिकच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आह.  हा दिवस जिल्हावासीयांना लाभ घेण्याचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. 

मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत कणकवलीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना श्री. राणे म्हणाले, महसूल हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे महसूल मंत्री पदावरील काम आम्हा सर्वच तरुण मंत्र्यांसाठी प्रेरणादायी आह.  निर्णय, अंमलबजावणी व पारदर्शकता हे त्यांचे सर्व गुण आदर्शवत आहेत. नारायण राणे व चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत जुने संबंध असल्याचेही नितेश राणे यांनी आवर्जून सांगितले.