LIVE UPDATES

नितेश राणेंचा 'तो' इशारा नेमका कुणाला?

विकासाच्या आड येणारे 'ते' मांजर मला माहित आहे
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 16:14 PM
views 76  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : सिंधुदुर्गात भूमाफिया असून स्थानिकांवर अन्याय होत असल्याने त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली होती. त्यावर कणकवलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी, जयंत पाटील यांना केवळ कागद दिला गेला व तो वाचण्याचे काम त्यांनी सभागृहात केले, अशी टीका केली.

सिंधुदुर्गात विकासाच्या आड येणारे हे मांजर कोण आहे हे मला माहित आहे असा इशारा देखील मंत्री नितेश राणेंनी दिला. नितेश राणेंनी हा इशारा नेमका कोणाला दिला याचीच चर्चा आता जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे. जयंत पाटील पर्यटनासाठी देखील सिंधुदुर्गात येत असतात. त्यामुळे सिंधुदुर्गचे नाव कोणी खराब करू. नये कोकणी बांधव विचारपूर्वकच जमिनी विकत असून तो स्वतः दर ठरवतो. येथे अधिकृत व्यवहार होत असतात मात्र जयंत पाटील यांना कोणीतरी कागद पोहोच केला तोच कागद पाटील यांनी सभागृहात वाचून दाखवला असे राणे म्हणाले.