LIVE UPDATES

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटीलांचा सन्मान

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 02, 2026 20:01 PM
views 54  views

सावंतवाडी : महसूल दिनानिमित्त आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटीलांचा सन्मान तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला. तिरोडा येथील लवू रगजी यांना तालुकास्तरावरील उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासनाला सहकार्य करणे तसेच नागरिकांशी समन्वय साधत जबाबदारीने कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस पाटलांच्या सेवेला यावेळी विशेष दाद देण्यात आली. लवू रगजी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल येथील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. यावेळी तिरोडा ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष सत्यवान आडारकर,मुंबई मंडळ सल्लागार विलास सावंत, रगजी यांचे वडील प्रभाकर रगजी,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर,दिलीप रगजी, ग्रीष्मा मांजरेकर,प्रतीक्षा रगजी ,सर्वांगी रगजी , दिनानाथ काळोजी, दिव्या काळोजी,मदन मुरकर आदी उपस्थित होते.यावेळी सुरेंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या गौरवावेळी श्री. रगजी यांनी सांगितले की, भविष्यातही अधिक जोमाने लोकसेवा करण्याची प्रेरणा आपल्या सन्मानामुळे मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.