
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चांगली संकल्पना आहे. जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये आम्ही ही शिबिरे घेतली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कणकवली तहसील कार्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या कार्यक्रमात निलेश राणे बोलत होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात वन संज्ञा, अकारीपड असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. 50 टक्के हून अधिक जमिनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आरक्षित आहेत. याबाबत वनमंत्र्यांसोबत पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी, असे आवाहनही निलेश राणे यांनी बावनकुळे यांना केले.










