LIVE UPDATES

महसूल मंत्री बावनकुळेंकडून पालकमंत्री नितेश राणेंचे कौतुक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 15:36 PM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या निमित्ताने कणकवलीत आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या कार्याचे कौतुक केले. नितेश राणेंमुळेच मासेमारीला कृषीचा दर्जा प्राप्त झाला. साहजिकच कोकणाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचे काम नितेश राणेंनी केले. कोकणचा हा शेर आपल्या खात्यांच्या माध्यमातून राज्याला ताकद देतो आहे. नितेश राणेंनी आपल्या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य व्यवसायाच्या हितार्थ चांगले निर्णय घेतले, राज्यात कोणत्याही मत्स्य तसेच बंदर विकास मंत्र्यांनी केले नाही असे चांगले काम नितेश राणेंकडून घडणार असल्याचेही, बावनकुळे म्हणाले