
कुडाळ : राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेत खुल्या गटात मानसी शिंदे, इयत्ता तिसरी ते पाचवी गटात मानसी सुकाळे तर इयत्ता सहावी ते नववी गटात देवस्वी तांबे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत सुमारे 850 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
कुडाळच्या आस्था फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण बॅ. नाथ. पै. कॉलेज एम. आय. डी. सी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आस्था फाऊंडेशन, कुडाळ, (सिंधुदुर्ग) आयोजित राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांसमवेत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, उमेश गाळवणकर ,उदय शिरोडकर ,राजाराम गव्हाणकर ,संजय बगळे ,स्वप्नाली सावंत आदी
राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा निकाल
गट क्रमांक एक इयत्ता तिसरी ते पाचवी प्रथम मानसी सुकाळे श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरुर, द्वितीय आरोही कदम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा, तृतीय रुद्र देसाई जिल्हा परिषद कुडाळ कुंभारवाडा, चौथा गार्गी आजगावकर जिल्हा परिषद शाळा कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा, पाचवा प्रणिता गुरव पांडुरंगशेठ पडतेवाडी कुडाळ, उत्तेजनार्थ मृण्मयी चव्हाण बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ, युगा राणे जिल्हा परिषद शाळा नेरूर चांदोस, देवश्री मेस्त्री प्राथमिक शाळा बाव ,विहान चव्हाण मदर क्विन इंग्लिश स्कूल सावंतवाडी, सादवी दळवी कुडाळ कविलकाटे, गट क्रमांक दोन इयत्ता सहावी ते नववी प्रथम देवस्वी तांबे कुडाळ हायस्कूल कुडाळ, द्वितीय दीप्ती मडकईकर स. का पाटील विद्यामंदिर केळुस, तृतीय मानसी शेट्ये स. का .पाटील विद्यामंदिर केळुस, चौथा लावण्या नेवगी श्री कलेश्वर विद्या मंदिर नेरूर, पाचवा मंजिरी सरंबळकर सरंबळ इंग्लिश स्कूल, उत्तेजनार्थ गौरी रेवंडकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माणकादेवी, यश मेस्त्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बांबुळी, सानिया सिकंदर शिंदयाळे आंबोली, फणसवाडी यशदा गोसावी, प्राथमिक शाळा बाव अक्षरा सावंत न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर, खुला गट मानसी शिंदे माणका देवी नेरूर, शबनम खान कुडाळ शहर
बक्षीस वितरण प्रसंगी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, बॅ. नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, आस्था फाऊंडेशन, कुडाळ (सिंधुदुर्ग) अध्यक्ष उदय शिरोडकर, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण डॉट कॉम असोसिएशन अध्यक्ष संजय बगळे, संचालक त्रिमूर्ती संगीत विद्यालय डॉ. राहुल गव्हाणकर, राजाराम गव्हाणकर ,स्वप्नाली सावंत, विद्या शिरोडकर ,सायली शिरोडकर, दिलीप मसके, यलाप्पा दळवी, मारुती गुंजाळ, सहदेव घाडी, मिनीनाथ आडसरे, राजेश परब, सहदेव पालकर, योगेश जाधव, श्री आजगांवकर, विद्यार्थी, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते
उदय शिरोडकर म्हणाले, आस्था फाउंडेशन ही संस्था सामाजिक शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य कला या क्षेत्राशी निगडित आहे. या सर्व क्षेत्रात जास्तीत जास्त सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थेचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती गुंजाळ यांनी केले. तर आभार यलाप्पा दळवी यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून केली. यावेळी सायली उदय गोसावी हिने पोर्टल शिक्षक परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.











