
सावंतवाडी : पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. यावेळी सावंतवाडीतील विविध संघटना, पदाधिकाऱ्यांनी श्री. मगदूम यांचे सावंतवाडीत स्वागत केले.
दरम्यान, विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी बदली झालेले अमोल चव्हाण यांच्याकडे उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश भागवत रजेवर असल्यामुळे दोन दिवस डीवायएसपी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत दोघांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, अमित राऊळ, मनोज राऊत आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










