
सावंतवाडी : शिल्पाग्रामकडील रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मोकळा करून देण्यात आला. यासाठी नगरपरिषदेचे दीपक म्हापसेकर यांच्यासह कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. माजी नगरसेवक श्री. जाधव यांनी घटनास्थळी जात पाहणी करत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात मदतकार्य केले.










