LIVE UPDATES

पंचायत समितीतर्फे 14 ऑगस्ट रोजी आमसभेचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 19:55 PM
views 23  views

सावंतवाडी : पंचायत समिती सावंतवाडीची आमसभा 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. मात्र, अपरिहार्य कारणास्तव ही आमसभा पुढे ढकलण्यात आली आहे. ही आमसभा 6 ऑगस्ट 2026 ऐवजी शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे होणार आहे. या बदलाची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.