
वेंगुर्ला : म्हापण ग्रामपंचायतच्या विरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विकास गवंडे यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मक्लेश आमरण उपोषण व उपोषणादरम्यान कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात गवंडे यांनी नमूद केल्यानुसार, ग्रामपंचायतवर विविध आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीने घेतलेल्या इनव्हर्टरची असलेल्या किमंतीपेक्षा भरमसाट किमंत लावलेली आहे. महिला बचतगटासाठी बांधलेल्या इमारतीला सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च पुरेसा आहे, मात्र आपण त्याची किंमत वाढवून सुमोर ३ लाखापेक्षा जास्त केलेली आहे. तसेच सदरची इमारत महसूल विभागाची असतानाही तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने वारेमाप खर्च केलेला आहे. तरी या कारणास्तव सरपंच, उपसरपंच व ज्या मासिक सभेत यासंबधीचा ठराव घेण्यात आला त्यातील सुचक अनुमोदक व उपस्थित ठरावाच्या बाजूने असलेले ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व यासंपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी लावण्यात यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे.
आपण स्वतः मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीबाबत नामांकित कंपनीचे एलईडी बल्प, ट्युबलाईट व चार्जीग बल्प ९५० रु. ना ग्रामपंचायतीला पोच मिळत असताना सुध्दा १६५० रु. ना घेऊन इतर मागासवर्गीस लोंकाची फसवणूक केलेली आहे. त्याबाबत मी ग्रामसभेत अश्या वस्तू घेऊ नये म्हणून ठराव घेतलेला असताना सुध्दा तो ग्रामसभेचा ठराव रेकॉर्डला न घेता पुन्हा सलग २ वर्षे असलेल्या किमतीपेक्षा भरमसाट किमतीला फॅन व टेबल घेतलेली आहेत त्याची मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन विभागिय चौकशी लावावी. म्हापण केंद्र शाळेमध्ये १ ली ते ५ वी पर्यंत १९ मुले व ६ वी मध्ये ६ मुले असताना सुध्दा फक्त २ च शिक्षक दिलेले आहेत तरी ६ वी साठी पदवीधर शिक्षक त्वरीत दयावा.
सन २०१४ मध्ये मी स्वतः ४ गुंठे जागा प्रांत परवानगी घेऊन व त्या आधारे ४ गुंठे खरेदीखत करुन मुरलीधर लक्ष्मण गवंडे यांना दिले तसेच ४ गुंठे प्रांत परवानगी घेऊन त्याआधारे ४ गुंठेच खरेदीखत कृपाली राकेश प्रसादे यांना दिले असे मिळून ८ गुंठे एवढे क्षेत्र खरेदीखताने दिलेले होते. मात्र तत्कालीन तलाठी पिंगुळकर मॅडम पर्वाश्रमीच्या चव्हाण मॅडम यांनी त्यांना ८ गुंठे ऐवजी ९ गुंठे येवढे क्षेत्र वाढवून दिले यामध्ये भारमोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. तरी आता संबधित तलाठयांना प्रमोशन मिळालेल आहे तरी त्यांच डिमोशन करुन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या म्हापण इथे असलेल्या कार्यकालामधील संपूर्ण प्रकरणांची चौकशी समती नेमून चौकशी करावी एवढीच अशी विनंती गवंडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.











