
सावंतवाडी : एस. आर. दळवी फाऊंडेशन, शाखा सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे 'उत्कर्ष शिक्षक अॅवाॅर्ड - २०२३' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला 'जीवनगौरव पुरस्कार' जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना फाऊंडेशनचे संस्थापक रामचंद्र दळवी, संचालिका सीता दळवी यांच्याहस्ते शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तुळशीचे रोप देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, डॉ. नयन भेडा, अल्पा शाह, महेश सावंत, प्रा. रूपेश पाटील, ज्योती बुवा, चेतन बोडेकर, सचिन मदने आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. तावडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ताजी बातमी
View all





संबंधित बातम्या
View all









































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































