LIVE UPDATES

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचा हा विजय

समाज मंदिर परिसरातील रहिवाश्यांकडून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 26, 2026 15:40 PM
views 32  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने दिल्ली येथील जंतर मंतर वर सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय मिळाला. त्यानिमित्ताने आज सावंतवाडी समाज मंदिर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा हा विजय आहे. त्यांनी देशाला दिलेल्या संविधानात आपले अधिकार, हक्क, मूलभूत कर्तव्य यांच्याच बळावर देशात लोकशाही जीवंत असल्यानेच हा विजय विद्यार्थ्यांना मिळाला अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यानिमित्ताने आज सावंतवाडी समाज मंदिर येथील भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज मंदिर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.