
कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक, वरवडे येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. वरवडे येथील उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष उर्फ पप्पू पुजारे, अर्चित कदम, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, सोहेल खान, सिझर फर्नांडिस, काका कदम, मंदार मेस्त्री, धनंजय सावंत लतिफ खान, अमोल घाडीगांवकर, सदा चव्हाण, शिवदास साधिये, रितेश बावकर, सलमान शेख, कुणाल प्रभुदेसाई, अभी देसाई, आयरिस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

हरकुळ बुद्रुक येथील उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाळा उर्फ प्रवीण सावंत यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत परब, रामचंद्र सावंत प्रसाद डोंगरे, नीलेश दळवी सीताराम सोहनी, जयदीप सोहनी सुहास जुवेकर, प्रमोद जुवेकर, अशोक जुवेकर, नूतन सोहनी, वैभव सावंत, हरकुल बुद्रुक कोटेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










