
दोडामार्ग : श्री देवी शांतादुर्गा देवस्थान, उसप' (नों. क्र. ए-४१०) च्या विश्वस्त मंडळासाठी उत्साहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्री. प्रकाश सखाराम गवस यांच्या नेतृत्वाखालील 'श्री देवी शांतादुर्गा पॅनल'ने ६ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला.
नवनिर्वाचित विश्वस्तांनी यापूर्वीही देवस्थानचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सांभाळला होता. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून मानकरी व भाविकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय वंशपरंपरागत हक्कांचा, मानकऱ्यांच्या एकजुटीचा आणि श्री देवी शांतादुर्गा मातेच्या कृपाशीर्वादाचा असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित मानकरी विश्वस्त पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली.
सातेरकर मानकरी : श्री. प्रदिपसिंह इंद्रसेन देसाई, श्री. विरसेन प्रतापराव देसाई
ब्राम्हणीकर मानकरी : श्री. प्रकाश सखाराम गवस, श्री. राजेश वासू गवस
केळबेकर मानकरी : श्री. भूपेश नारायण गवस
घाडीवसकर मानकरी : श्री. भरत अर्जुन गवस आदीची निवड झाली आहे
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्री. द. ल. सावंत, तसेच सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय (कोल्हापूर विभाग) चे निरीक्षक श्री. सत्यनारायण पुंडलिक शेणई व श्री. बापू शिवराम जाधव यांच्या थेट उपस्थितीत आणि देखरेखीखाली शांततेत पार पडली.
या दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित विश्वस्तांनी निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, मानकरी आणि भाविकांचे जाहीर आभार मानले आहेत. लवकरच अधिकृत कार्यभार स्वीकारून देवस्थानचे सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रम पूर्ववत आणि अधिक जोमाने सुरू करण्यात येतील, अशी माहिती नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने दिली.










