
कणकवली : कणकवली शहरातील ज्येष्ठ लेडीज टेलर व्यावसायिक कृष्णा धोंडीराम बुचडे यांचे २४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते गेल्या सुमारे २० वर्षांपासून कणकवली शहरात हर्णे आळी येथे शैलेश लेडीज टेलर या नावाने व्यवसाय करत होते.
आपल्या शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा ग्राहक व परिचितांमध्ये स्नेहपूर्ण संबंध होता. त्यांच्या निधनाने कुटुंबीय,नातेवाईक तसेच परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.










