LIVE UPDATES

खासदार नारायण राणेंच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचं लोकार्पण

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 15:25 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नूतन दालनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान व प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे. लोकार्पणप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाडाचे रोप देऊन केले.