LIVE UPDATES

रस्ते महामंडळाचे अधिकारी दर गुरुवारी दोडामार्गात येणार

आमसभेत युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी मांडलेला मुद्दा
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 16:30 PM
views 18  views

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारीत नव्याने होत असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या विषयावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले. 11 वर्षानी झालेल्या आमसभे वेळी रस्त्याच्या मनमानी कारभार आणि रस्ता दोडामार्गात आणि ऑफिस मुंबईत हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असे ठाकरे सेनेचे युवा तालुका प्रमुख मदन राणे यांनी बोल्यावर आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आठवड्याच्या दर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागात स्थानिकांच्या प्रश्नासाठी बसण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे दर गुरुवारी MSRDC चे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागात उपस्थित असणार आहेत.

दोडामार्ग तालुक्याचा विकास अवश्य करा त्याला आमचा विरोध अजिबात नाही. मात्र, लोकांना त्रास देऊन मनमानी कारभार, रस्ते करताना नियमांचे पालन, या सर्व गोष्टीचे पालन करून दोडामार्ग तिलारी रस्ता करा. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचते, अनेक ठिकाणी चिखल, त्यामुळे अनेक अपघात झाले गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे. त्यात रस्ता करताना ठेकेदाराची मनमानी अरेरावी हे सध्या चालत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे या ठिकाणी ऑफिस नाही कोणताही विषय घडला तर विचारायचे कोणाला ? यांचे ऑफिस आहे मुंबईला त्यामुळे संबंधित विभागाचे ऑफिचे, किंवा त्यांचे निर्णय घेणारे अधिकारी दोडामार्गत बसवा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा विषय आमसभेत मदन राणे, तालुका प्रमुख संजय गवस, भिवा गवस व अन्य पदाधिकाऱ्यांनी मांडल्यावर आमदार दीपक केसरकर यांनी रस्ते महामंडळ च्या अधिकाऱ्याना सूचना करून आठवड्याच्या दर गुरुवारी सदर विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे उपस्थित ठेवा जेणे करून इथल्या स्थानिक जनतेचे कोणतेही प्रश्न असले तर त्याचे निरसन  व्हायला पाहिजे. यासाठी हे अधिकारी दोडामार्गात येणार आहेत.