
सिंधुदुर्ग : राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. काल झालेल्या चहा पाण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यातच काल सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. आजपासून हे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून हे अधिवेशन एकूण तीन आठवडे म्हणजे 10 जुलैपर्यंत चालणार आहे. विधानसभा व विधानपरिषदेत आज नवनिर्वाचित आमदारांचा परिचय होणार असून नुकत्याच बिनविरोध झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमधील 10 आमदारांचा परिचय होणार आहे. विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, आणि राजकीय घडामोडींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.











