
सावंतवाडी : सावंतवाडीची जनता खड्यात असताना तसेच पाणी टंचाईने त्रस्त असताना त्यांना वाऱ्यावर सोडून नगरसेवक काश्मिर टूरवर गेले आहेत, अशी टीका मनसे शहराध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी केली.
सावंतवाडीती शहरातील नागरीक पावसाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शहरवासीय पाणीटंचाईला तोंड देत आहे. लहान मुलं आबाल वृद्ध गरमीने त्रस्त झाले आहेत. सावंतवाडीवर रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्या संदर्भात काहीही नियोजन नाही. लोकांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात कोणतेही नियोजन न करता कामकाजाचा कोणताही अनुभव नसलेले नगरसेवक सावंतवाडीकरांना ऐन गरजेच्यावेळी वाऱ्यावर सोडून काश्मीर टूरवर गेलेत. हे लोकांच्या हिताचे नाही अशी टीका ॲड. कासकर यांनी केलीय.










