LIVE UPDATES

वेंगुर्ला पोलिसांची गोवा बनावटी दारू विक्रीवर धडक कारवाई

१ लाख ७९ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 21, 2026 12:34 PM
views 609  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरा देऊळवाडी येथे गोवा बनावटी दारू विक्री वर वेंगुर्ला पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शनिवारी २० जून रोजी रात्री या ११ वाजताच्या दरम्याने केलेल्या या कारवाईत १ लाख ७९ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून दारु विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या बाबत पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर यांनी वेंगुर्ला पोलिसात तक्रार दिली आहे.  बेकायदेशीर दारू विक्री करता जवळ बाळगल्या प्रकरणी वेतोरा देउळवाडी येथील शिवानी शंकर सातार्डेकर (४४) व शंकर काशीराम सातार्डेकर (४८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोजा, जयेश सरमळकर, मनोज परुळेकर, गजानन देसाई, महिला होमगार्ड डीसोजा हे सहभागी होते.