
कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली.
बबली राणे हे गेल्या ३० वर्षांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. विशेषतः महामार्गावर होणाऱ्या अपघात प्रसंगी ते सदैव मदतीला धावून जातात. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. बबली राणे ओसरगावचे माजी उपसरपंच देखील आहेत. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बबली राणे यांच्या पत्नी चंदना सावंत यांनी ओसरगाव पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढवली होती. अवघ्या काही मतांनीच त्यांचा पराभव झाला होता. अर्थातच बबली राणी यांच्या कार्याची दखल घेऊन वैभव नाईक यांनी विभागप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. उबाठा शिवसेना व श्री नाईक यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलेन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असेच काम करेन, असा विश्वास बबली राणी यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल राज्यभरातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बबली राणे यांचे अभिनंदन केले.











