
सिंधुदुर्ग : विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होतील. मजबूत असणाऱ्या महायुतीसमोर विरोधकांपेक्षाही बंडखोरांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आल की नाही ? हे पाहण्यासाठी अंतिम निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
यात ठाणे - रवींद्र फाटक - शिवसेना, यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी - शिवसेना, रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे - विक्रम काकडे - राष्ट्रवादी काँग्रेस, वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर - अरुण लखाणी - भाजप, अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे - भाजप हे बिनविरोध झाले असून आज सोलापूर,जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया,नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना यांचे निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाची टक्केवारी बघता नाशिक 100%भंडारा - गोंदिया 100%सांगली - सातारा 99.89%परभणी - हिंगोली 99.78%सोलापूर 99.68%धाराशिव - लातूर - बीड 99.49%छत्रपती संभाजीनगर - जालना 98.90%नागपूर 98.44%जळगाव 97.78%अमरावती 94.68% एवढी आहे.











