
वेंगुर्ला : वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई यांनी आज शिरोडा ग्रामपंचायतला भेट देत ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांवर तसेच प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी सरपंच लतिका रेडकर व उपसरपंच चंदन हाडकी यांनी सभापती व उपसभापती निवड झाल्यानंतर प्रथमच शिरोडा ग्रामपंचायत मध्ये आल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर, सुधीर नार्वेकर आदी उपस्थित होते. नुकतीच शिरोडा सरपंच लतिका रेडकर व उपसरपंच चंदन हाडकी यांनी शिरोडा ग्रामपंचायत हद्दीतील काही प्रलंबित प्रश्नांवर तसेच विविध समस्यांवर सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. या अनुषंगाने आज सभापती व उपसभापती यांनी शिरोडा ग्रामपंचायतला भेट घेत विविध विषयांवर व प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली.











