LIVE UPDATES

विधान परिषदेत बिनविरोध निवड

रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 08, 2026 21:53 PM
views 34  views

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्यानंतर रवींद्र फाटक यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी काळात जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. 

यावेळी फाटक यांनी पक्ष नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विधान परिषदेत प्रतिनिधित्व करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच विकासकामांना अधिक गती देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असून, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतले जाणारे निर्णय प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करत आगामी काळात जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.