LIVE UPDATES

कुडाळमध्ये २० जूनपासून जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा

१६ जूनपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 08, 2026 21:55 PM
views 51  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने येत्या २० व २१ जून २०२६ या कालावधीत 'जिल्हा निवड चाचणी २०२६' बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील 'संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी'मध्ये ही भव्य स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेतून निवडक खेळाडूंची आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघात निवड केली जाणार आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून १५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. मुला-मुलींच्या ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षे वयोगटासह खुल्या गटात  ही स्पर्धा खेळवली जाईल. यामध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तिन्ही प्रकारांचा समावेश असेल. स्पर्धेचे रीतसर उद्घाटन २० जून रोजी होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक आणि भव्य करंडक (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देणे, नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जिल्हा संघाच्या माध्यमातून त्यांना राज्य पातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी १६ जून २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. खेळाडूंनी आपली नावनोंदणी www.mbasso.in या संकेतस्थळावर जाऊन करायची आहे.

या स्पर्धेचा लाभ घेत खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी राज चव्हाण (9405809001) किंवा समद शेख (7775808295) यांच्याशी संपर्क साधावा.