
सिंधुदुर्गनगरी : कसाल मालवण रस्त्यावर कट्टा ते कणकवली या दिशेने जाणाऱ्या बोअरवेल गाडीचा अपघात झाला असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कसाल ग्रामपंचायतच्या समोर हा अपघात झाला असून, बोरवेल खोदकाम करणारी गाडी पूर्णपणे रस्त्याच्या खाली कोसळली आहे. हा अपघात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.











