
सिंधुदुर्ग : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या निवडणुकीत ॲड. संग्राम देसाई हे बहुमताने विजयी झाले आहेत. ही निवडणूक प्राधान्यक्रम मतदान पद्धतीनुसार पार पडली असून सहाव्या क्रमांकावर विजयी होणारे ते उमेदवार ठरले आहेत. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसिद्ध वकील तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई हे एकमेव उमेदवार रिंगणात होते. महाराष्ट्र व गोवा येथून 159 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले होते. २५ जागांसाठी ही निवडणूक होत होती. त्यात ६ क्रमांकांची मत मिळवत ॲड. देसाई यांनी विजय संपादन केला आहे. ॲड. नाईक म्हणाले, २५ सदस्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक झाली. ६ व्या क्रमांकावर ॲड. देसाई हे विजयी झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील संघटनेचे सदस्य सर्वात कमी असूनही त्यांनी मोठं यश संपादीत केल आहे. अनेकांनी यात राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सगळे डाव मतदारांनी हाणून पाडत ॲड. संग्राम देसाई यांना बहुमताने विजयी केले आहे.












