LIVE UPDATES

Omkar Elephant : दोडामार्ग, सावंतवाडीतून 'ओंकार' हत्ती कुडाळात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 06:09 PM
views 531  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात वास्तव्यास असलेला ओंकार हत्ती आता कुडाळ तालुक्यात पोहचला आहे. सावंतवाडी तालुक्यातून त्याने कुडाळ येथे आपले बस्तान हलवले आहे‌‌. ओंकारला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून शेतकऱ्यांसह ग्रामीण भागात काहींचे नुकसान देखील होत आहे. 

दोडामार्ग तालुक्यातून ओंकार सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला होता. ओटवणे, असनिये, कोनशी, इन्सुली, मळगाव, नेमळे गावातून तो आता आकेरी गावात पोहचला आहे. सावंतवाडीची हद्द पार करत तो कुडाळ तालुक्यात दाखल झाला आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचही नुकसान होत आहे. वनविभागाकडून या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. तर गोव्यासह दोडामार्ग, सावंतवाडी फिरून कुडाळ तालुक्यात दाखल झालेला ओंकार आता पुढचा प्रवास कसा करतोय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.