LIVE UPDATES

चौकुळ शाळा नं. १ येथे ‘एक राखी सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 15:41 PM
views 35  views

सावंतवाडी : श्रमातून कौशल्य, कौशल्यातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून आनंद असे ब्रीद घेऊन जि. प. केंद्र प्राथमिक शाळा चौकुळ नं. १ च्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा आणि देशप्रेम या मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने ‘श्रमातून आनंद’ या उपक्रमांतर्गत शाळेत विशेष राखी तयार करणे व आठवडा बाजारात 'त्या' राखी विक्री तसेच ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. 

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार करून त्यांची आठवडा बाजारात विक्री केली. तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक शितल गावडे, उपशिक्षक गणपती पाटील, पदवीधर शिक्षक गोविंद पाटील व किरण माने यांच्या मार्गदर्शन खाली राबवण्यात आला. तर या उपक्रमास ग्रुप ग्रामपंचायत चौकुळचे प्रशासक गुलाबराव नारायण गावडे तसेच पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.