LIVE UPDATES

Sawantwadi Water Supply Update : पाळणेकोंड धरणासंदर्भात न.प.चा खुलासा

२ मीटरने पाणी कमी ; मात्र, झरे प्रवाहीत : मुख्याधिकारी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 18:17 PM
views 36  views
Sawantwadi Water Supply Update: Palanekond Dam Has 16 Metres of Water Storage

सावंतवाडी : पाळणेकोंड धरण या जलस्रोताची साठवण क्षमता 18 मीटर असून सध्या 16 मीटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील काही वर्षाची सरासरी पाहता यावर्षी 2 मीटरने पाणी कमी आहे. सध्या डोंगराळ भागातून पाळणेकोंड धरणामध्ये येणारे पावसाचे झरे आज मितीपर्यंत सुरु आहेत. तसेच केसरी झरेमधून सावंतवाडी शहरास सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत होत आहे असा खुलासा प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केला. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यात म्हटले आहे की, सावंतवाडी शहरास पाळणेकोंड धरण व केसरी झरे येथून पाणी पुरवठा केला जातो. सावंतवाडी पाणीपुरवठा योजना हो गुरुत्वाकर्षणावर आधारित आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरातील वॉर्डमध्ये सकाळी व संध्याकाळ या सत्रात विभागून पाणीपुरवठा केला जातो.

सन. 2026-27 या वर्षी जून मध्ये पाऊस सूरू होऊन पाळणेकोंड धरण 11 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3.30 वाजता ओव्हर-फ्लो झाले आहे. पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो झाल्याची नोंद गाळणी चालक यांनी लेव्हल नोंद वहीमध्ये केलेली आहे.

धरण ओवर-फ्लो झाल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी धरणामधील साचलेला गाळ, माती व इतर अशुद्धता बाहेर काढण्यासाठी नियोजित पद्धतीने पाळणेकोंड धरणाचा मेन वॉश आऊट व्हॉल्व जोडारी व पाणी पुरवठा कुशल व अर्धकुशल कर्मचारी यांच्यामार्फत सोडला जातो. याबाबतची माहिती नजीकचे गाव कुणकेरी ग्रामपंचायत यांना दिली जाते. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी धरणाचा मेन वॉश आऊट व्हॉल्व बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.